महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तत्कालीन भांडारपालासह चौघांवर गुन्हा दाखल - ratnagiri Stockist issue

हिशोबी मालमत्ता प्रकरणी नाचणकर कुटुंबीयांना कोणताही खुलासा करता आला नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अशोक नाचणकर, सौ. अर्चना नाचणकर, संपदा नाचणकर, अंकिता नाचणकर या चौघांना विरोधात भादंविकचे कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी

By

Published : Sep 24, 2019, 3:03 AM IST

रत्नागिरी- उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा बेहिशोबी मालमत्ता असल्याप्रकरणी सार्वजनिक विभाग दक्षिणच्या तत्कालीन भांडारपालासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. भांडारपाल अशोक विठ्ठल नाचणकर यांच्यासह पत्नी सौ. अर्चना नाचणकर, मुलगी संपदा नाचणकर, अंकिता नाचणकर या चौघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे १ कोटी ७३ लाख ५६ हजार ८५२ रु. एवढी रक्कम अधिक असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी

अशोक नाचणकर हे सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिणचे भांडारपाल म्हणून कार्यरत होते. दि. १५ मार्च २००३ ते दि.३ मार्च २०१५ या कालावधीत त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा एकूण एक कोटी ७३ लाख ५६ हजार ८५२ रु. अपसंपदा गोळा केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत स्पष्ट झाले. यापूर्वी नाचणकर कुटुंबीयांना खुलासा सादर करण्यासाठी वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, नाचणकर व त्यांचे कुटुंबीय चौकशीसाठी हजर राहिले नाहीत .

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी नाचणकर कुटुंबीयांना कोणताही खुलासा करता आला नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अशोक नाचणकर, सौ. अर्चना नाचणकर, संपदा नाचणकर, अंकिता नाचणकर या चौघांना विरोधात भादंविकचे कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी नाचणकर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग विभागात खळबळ उडाली.

ABOUT THE AUTHOR

...view details