रत्नागिरी- रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा शिवसेनेचे सचिव विनायक राऊत हे खासगी संस्थेच्या सर्वेक्षणानुसार पुन्हा एकदा लोकप्रिय खासदार ठरले आहेत. फोम इंडिया-एशिया पोस्टने देशातील 25 लोकप्रिय खासदारांची नावे जाहीर केली आहेत.
फेम इंडियाने सर्वेक्षण करून लोकप्रिय खासदाराची निवड केली आहे. यामध्ये सार्वजनिक काम, प्रभाव, प्रतिमा शैली व सभागृहात केलेले कामकाज असे निकष लावण्यात आले आहेत.
हेही वाचा-२२ जानेवारीला म्हाडाची 5 हजार 647 घरांसाठी सर्वात मोठी लॉटरी
असे आहेत पुरस्कार
फेम इंडियाने विविध श्रेणीत 25 खासदारांच्या निवड केल्या आहेत. यामध्ये प्रभावी खासदार म्हणून सीआर पाटील, उत्कृष्ट - भारती हरी, उत्साही - निशिकांत दुबे, ज्येष्ठ - के. सुरेश , कर्मठ - विनायक राऊत , विलक्षण- अजय भट , कर्तव्य- सुरेशकुमार कश्यप , युवा- राजू बिष्ट , प्रेरक- जगदंबिका पालव , विशेष- भीमराव बी . पाटील , यशस्वी- जुगल किशोर शर्मा, बुलंद - गौतम गंभीर, दक्ष - राहुल शेवाळे , मजबूत धरमवीर सिंग व स्पॉटलाइट - नवनीत कौर राणा अशी विविध निवडी करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-जयंत पाटलांचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल
असे लावले निकष-
फेम इंडियाने सर्वेक्षण एजन्सी एशिया पोस्टच्या संयुक्त विद्यमाने दीर्घ सर्वेक्षण आणि स्थानिक माध्यमातून केले. यामध्ये लोकसभा, समाजसेवा, जनजागृतीपासून ते लोकसभा जागांपर्यंतच्या लोकसभा मूल्यांना बळकट करण्याचे काम केलेल्या 25 खासदारांना निवडण्यात आल्याचा दावा फेम इंडियाने केला आहे. या सर्वेक्षणात खासदारांची सार्वजनिक कामात सक्रिय, प्रभाव, प्रतिमा, ओळख, शैली, मतदार संघातउपस्थिती, वादविवादात भाग घेणे, खासगी विधेयक, मतदारसंघातील प्रश्न व खासदार निधीचा योग्य वापर आणि सामाजिक सहभाग हे मुख्य निकष होते. फेम इंडियाने 542 खासदारांमध्ये हे 25 खासदार निवडण्यात आले आहेत.