रत्नागिरी- रोहीणी नक्षत्राच्या मुहूर्तावर बळीराजाने कोकणात पेरणीला सुरुवात केली आहे. पण ही पेरणी धूळ पेरणी आहे. पावसाची वाट न बघता शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रोहीणी नक्षत्रात धुरळायुक्त जमिनीत भाताची पेरणी करतात.
कोकणात धूळ पेरणीला सुरुवात; आता पावसाची प्रतीक्षा - पेरणी
पावसाची वाट न बघता शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रोहीणी नक्षत्रात धुरळायुक्त जमिनीत भाताची पेरणी करतात. त्यानंतर या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असते.
धूळ पेरणीसाठी शेत खणताना शेतकरी
भाताचे हे बियाणे हळव्या प्रकारातील असल्याने पीक ९० दिवसात तयार होते. कातळ जमिनीत अंतीम टप्प्यात पावसाचे प्रमाण कमी झाले, तरी पिकाला धोका संभवत नाही. शेताची भाजणी झाली, की नंतर शेत साफ केले जाते. भात पेरून मग कुदळाच्या सहाय्याने उकरले जाते. ग्रामीण भागात या पेरणीला धूळ पेरणी असे म्हणतात. मात्र बळीराजाने पेरणीचा मुहूर्त जरी केला असला, तरी त्याला आता पावसाची प्रतीक्षा आहे.