महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जमिनीसोबत संपूर्ण घराचे झाले दोन भाग; राजापूर तालुक्यातील ओणी गावातील प्रकार

राजापूर तालुक्यातील ओणी तिसेवाडीत जमिनीसोबत घराचे दोन भाग झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवीतहानी झालेली नाही.

राजापूर तालुक्यातील ओणी तिसेवाडीत जमिनीसोबत घराचे दोन भाग झाले आहेत

By

Published : Aug 6, 2019, 9:39 PM IST

रत्नागिरी -मागील काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. जमीन खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राजापूर तालुक्यातील ओणी तिसेवाडीत जमिनीसोबत सगळे घरचं खचल्याची घटना घडली. घराचे दोन भाग झाले असून, सुदैवाने घरातील नऊ जणांचा जीव वाचला.

राजापूर तालुक्यातील ओणी तिसेवाडीत जमिनीसोबत घराचे दोन भाग झाले आहेत
तिसेवाडी भागात अतिवृष्टीमुळे भुस्खलन झाले आहे. डोंगराला संपूर्ण भेग पडली आहे. तसेच डोंगरपायथ्याच्या भात शेती आणि घरामध्ये पाच फुट भेग पडली. त्यामुळे एक घर पूर्ण पडले आहे. तर इतर दोन घरे खचली आहेत.ओणी तिसेवाडीतील सुरेश भारती यांच्या घराला सोमवारी रात्री भेगा पडल्या. त्यानंतर भारती यांच्या कुटुंबीयांनी शेजारील घरात आसरा घेतला. पण पहाटे त्या घराचेही दोन भाग झाले. या घटनेने सुरेश भारती यांच्या घराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर रघुनाथ हातणकर यांच्या घराला तडे गेले आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर प्रशानाचा एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details