रत्नागिरी - रत्नागिरी ते वेर्णा या मार्गावरील रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले ( Ratnagiri Verna Electrification Work Completed ) आहे. अंतिम टप्प्यातील मार्गाची सीआरएस तपासणी 22 आणि 24 मार्च रोजी करण्यात येईल. त्यानंतर, कोकण रेल्वे विजेवर धावण्याची शक्यता ( Electrification Work Konkan Railway Completed ) आहे. गेली सहा- सात वर्षे कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम सुरु होते. अखेर काम पूर्णत्वास गेल्याने कोकण रेल्वेचे प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरु होणार आहे.
मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत आहे. सध्या डाऊन दिशेला रत्नागिरीपर्यंत मालगाड्या तसेच दिवा - रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह चालवली जात आहे. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गापैकी रत्नागिरी ते वेर्णा या अंतिम टप्प्यातील विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून २२ व २४ मार्च रोजी तपासणी केली जाणार आहे. यासाठी सात कोचसह सीआरएस स्पेशल ट्रेन २१ मार्च रोजी रात्री ११ वाजता सीएसटीहून कोकण रेल्वे मार्गांवर येण्यासाठी रवाना होतील.