कोकण परिमंडळात १५१ कोटींचे वीजबिल थकीत; महावितरणसमोर वसुलीचे आव्हान - वीज बिल थकीत रक्कम
रत्नागिरी जिल्ह्यातील १ कोटी ६१ लाख ३०३ ग्राहकांकडे तब्बल ८४ कोटींची थकबाकी शिल्लक आहे. तर कोकण परिमंडळात १५१ कोटी ५१ लाखाची थकबाकी असल्याने महावितरणसमोर वसुलीचे आव्हान उभे राहिले आहे.
रत्नागिरी- कोरोना प्रादुर्भावामुळे घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत महावितरणची बिल वसुलीची प्रक्रिया ठप्प झाली होती. त्याचा फटका महावितरणला बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १ कोटी ६१ लाख ३०३ ग्राहकांकडे तब्बल ८४ कोटींची थकबाकी शिल्लक आहे. तर कोकण परिमंडळात १५१ कोटी ५१ लाखाची थकबाकी असल्याने महावितरणसमोर वसुलीचे आव्हान उभे राहिले आहे. मात्र आता वरिष्ठ पातळीवरूनच वसुलीचे आदेश आले आहेत त्यामुळे थकबाकी कमी होईल असा अंदाज आहे.
जिल्ह्यातील एकूण १ कोटी ६१ लाख ३०३ ग्राहकांकडे थकबाकी