रत्नागिरी- कोकणातील घरघुती गणपती उत्सवाला फार मोठी परंपरा आहे. घरगुती गणपती उत्सव साजरा करत असताना घराघरात गणपतीसाठी देखावे सादर करण्याची परंपरा कोकणात पहायला मिळते. अश्याच देखाव्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संदेशही देण्यात येतात. कुवारबावमधील कोळवणकर कुटुंब गेली २१ वर्ष गणेशोत्सवाच्या मखर सजावटीमधून सामाजिक संदेश देत आहे.
रत्नागिरीतल्या कोळवणकर कुटुंबीयांनी साकारला 'इको फ्रेंण्डली' गणपती; निसर्ग संवर्धनाचा संदेश
कोकणातील कोळवणकर कुटुंबीयांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा देखावा साकारला आहे. कुवारबावमधील कोळवणकर कुटुंब गेली २१ वर्ष गणेशोत्सवाच्या मखर सजावटीमधून सामाजिक संदेश देत आहे.
कोळवणकर कुटुंबीयांनी निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा देखावा साकारला आहे. हत्तीच्या सोंडेतल्या कमळाच्या फुलावर गणपती बाप्पा निसर्गाच्या सानिध्यात विराजमान झाल्याचा हा देखावा आहे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंपासून हा देखावा तयार करण्यात आला आहे. देखाव्यातील हत्ती हा पुठ्ठा, सुपारीची वीरी, बांबू, बारदाण अशा वस्तूंपासून तयार करण्यात आला आहे. गणपतीच्या डोक्यावर असणारी डंबरी ही नारळाच्या झापापासून तयार करण्यात आली आहे. माणसाने पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा यासाठी असा संदेश या देखाव्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे.