महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संगमेश्वरजवळील उक्षी येथे नदीत इको कार कोसळली, एक जण गेला वाहून - man swept away

या घटनेत एक जण गाडिसोबतच वाहून गेला. तर पाच जण कारमधून बाहेर फेकले गेल्याने बचावले. करुणा मूर्ती असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तो सिट बेल्ट लावल्यामुळे कारसोबतच वाहून गेला.

संगमेश्वरजवळील उक्षी येथे नदीत इको कार कोसळली, एक जण गेला वाहून

By

Published : Aug 5, 2019, 12:33 AM IST

रत्नागिरी -संगमेश्वरजवळच्या उक्षी येथील नदीत इको कार कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक जण गाडिसोबतच वाहून गेला. तर पाच जण कारमधून बाहेर फेकले गेल्याने बचावले. करुणा मूर्ती असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तो सिट बेल्ट लावल्यामुळे कारसोबतच वाहून गेला.

संगमेश्वरजवळील उक्षी येथे नदीत इको कार कोसळली, एक जण गेला वाहून

हेरंब कदम, अतुल करंदीकर, प्रसाद शिर्के, प्रशांत म्हात्रे आणि पराग पेडणेकर, अशी बचावलेल्यांची नावे आहेत.

हे सर्वजण दुपारी उक्षी येथील धबधब्यावर गेले होते. रत्नागिरीत परतत असताना वळणाचा अंदाज न आल्याने गाडी १०० फुट खोल नदीत कोसळली. गाडीसह वाहून गेलेल्याचा शोध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details