रत्नागिरी-पश्चिम महाराष्ट्रात मागील काही मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांना पूर आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूराचा थेट परिणाम कोकणावर झाला आहे. जिल्ह्यात दुधाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरामुळे कोकणात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका; जिल्ह्यात दुधाचा मोठा तुटवडा - kolhapur news
पश्चिम महाराष्ट्रातील पूराचा थेट परिणाम कोकणावर झाला आहे. जिल्ह्यात दुधाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पूरामुळे कोकणात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दरोरोज ६० हजार लिटर दुधाची आवश्यकता असते. मात्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज इथे भयानक पुरपरिस्थिती झाली आहे. बुधवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्यात पूरामुळे कोणत्याच कंपनीचे दुध पोहचू शकले नाही. गोकुळ, वारणा, चितळे, कृष्णा अशा कोणत्याच कंपन्याचे दुध पोहचू शकले नाही. दुधाच्या गाड्या विविध ठिकाणी पुरात अडकल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात दुधाच्या एकाही थेंबाचे वितरण होवू शकले नाही. त्यामुळे दुधासाठी रत्नागिरीकरांना जंगजंग पछाडावे लागत आहे. पुरपरिस्थिती आणखी भीषण झाली, तर उद्या देखील रत्नागिरीकरांना दुध मिळणार नसल्याची भिती व्यक्त केली जात आहे. जिवनावश्यक असलेल्या दुधाची रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थिती किती भयानक आहे, याचा आढावा घेत ग्राहक तसेच जिल्ह्यातील गोकुळ दुधाचे वितरक निखिल देसाई यांच्याशी आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी बातचीत केली.