महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत शिवसनेचे वर्चस्व, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्येही चांगली कामगिरी - उदय सामंत - vote count uday samant reaction

जिल्ह्यात शिवसनेने एकतर्फी वर्चस्व मिळवले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेची कामगिरी चांगली आहे. ग्रामीण भागातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

uday samant reaction ratnagiri
उदय सामंत रत्नागिरी

By

Published : Jan 18, 2021, 3:57 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यात शिवसनेने एकतर्फी वर्चस्व मिळवले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेची कामगिरी चांगली आहे. ग्रामीण भागातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत

हेही वाचा -रत्नागिरीत ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीला सुरूवात

जिल्ह्यात एकतर्फी शिवसेना पॅनल विजयी

सामंत म्हणाले की, मतमोजणीचे कल बघता जिल्ह्यात एकतर्फी शिवसेना पॅनल विजयी झाले आहेत. याची प्रचिती माझ्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात येत आहे. तसेच, देवगडमध्ये एकही ग्रामपंचायत आमच्याकडे नव्हती, तिथे आम्ही 5 ते 6 ग्रामपंचायतीमध्ये यश मिळवले आहे. तसेच, वैभववाडीमध्येसुद्धा आमच्याकडे एकही ग्रामपंचायत नव्हती, तिथेही आम्ही 3 ग्रामपंचायती जिंकलो आहोत. कणकवलीतही 3 ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या आहेत. मी ज्या जिल्ह्याचा संपर्कमंत्री आहे, त्या कोल्हापूरमध्ये देखील शिवसेना पुढे आहे.

जनतेने उद्धव ठाकरेंवर विश्वास दृढ केला - सामंत

महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावरचा विश्वास दृढ केलेला आहे. आणि ठाकरे हे महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनामध्ये आहेत. हे ग्रामपंचायत निवडणुकीवरून सिद्ध झाले आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

हेही वाचा -चिपळूणच्या खाडीपट्ट्यात अनधिकृतपणे वाळू उत्खनन, कारवाईच्या मागणीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष?

ABOUT THE AUTHOR

...view details