महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शनिवारपर्यंत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधकाऱ्यांचे आदेश

वादळी पावसामुळे झालेल्या भात शेती व तत्सम पिके यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे 2 नोव्हेंबरपूर्वी (शनिवार) सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

By

Published : Oct 29, 2019, 5:39 PM IST

Updated : Oct 29, 2019, 8:20 PM IST

रत्नागिरी- ऑक्टोबर महिन्यात आलेल्या वादळी पावसामुळे भात शेती व तत्सम पिके यांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे करून 2 नोव्हेंबर पूर्वीविहित नमुन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.

शनिवारपर्यंत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधकाऱ्यांचे आदेश


तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक यांनी संयुक्त पाहणी करावी, नुकसान झालेल्या भात शेती व इतर शेतीचे सातबारा तलाठ्यांनी तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. यानुसार नुकसान झालेल्या भागात संयुक्त पाहणी करून झालेल्या नुकसानीची माहिती विहित नमुन्यात कोणत्याही परिस्थितीत 2 नोव्हेंबरपूर्वी सादर करण्याचे निर्देश या लेखी आदेशात देण्यात आले आहेत. या आदेशानुसार आज तत्काळ भात शेती व इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्याचे काम जिल्ह्यात सर्व ठिकाणी सुरू झाले आहे.

Last Updated : Oct 29, 2019, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details