रत्नागिरी- कोरोनाचे थैमान जगभरात सुरु आहे. कोरोनाचा प्रसार थांबावा यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. अशावेळी बंदोबस्तासाठी पोलीस जनतेला घरी राहण्याचे आवाहन करत असून होईल ती मदतही करत आहेत. अशावेळी लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सुद्धा एक सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून रत्नागिरी आर्मीने पुढाकार घेऊन रत्नागिरी शहर आणि परिसरातील विविध पोलीस ठाणी, चौक्या आणि रत्नागिरीतील विशेष कारागृह येथे जंतुनाशक फवारणी करण्यात केली.
सामाजिक भावनेतून काम करणारे अनेकजण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुढे यांच्या संककल्पनेतून साकार झालेल्या रत्नगिरी आर्मीमध्ये एकत्रित झाले आहेत. आपल्या रत्नागिरीसाठी काम करणाऱ्या या सैनिकांनी फवारणीसाठी पुढाकार घेतला. सर्वसामान्यांसाठी आपला जीव धोक्यत घालत असलेल्या पोलीस बांधवांच्या आरोग्याचीही काळजी आम्हाला आहे हाच संदेश यातून रत्नागिरी आर्मीने दिला.
कोरोनाविरोधातील युद्धात पोलिसांच्या आरोग्याची रत्नागिरी आर्मीने घेतली काळजी - संचारबंदी बातमी
दिवसभर संचारबंदीत कोणीही घराबाहेर पडू नये, यासाठी पोलीस आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभे आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून रत्नागिरी आर्मीकडून रत्नागिरी शहर व परिसरातील सर्व पोलीस ठाणी, चौक्या आणि कारागृहात जंतुनाशक फवारणी केली.
फवारणी करताना
यावेळी महेश गर्दे, डॉ चंद्रशेखर निमकर, सिद्धांत शिंदे, निहार वैद्य, धीरज पाटकर, सचिन शिंदे आणि अन्य रत्नागिरी आर्मीच्या सैनिकांनी यामध्ये पुढाकार घेतला.
हेही वाचा -चिंताजनक..! 'त्या' महिलेच्या संपर्कातील एकाला कोरोनाची लागण; एकूण आकडा...