रत्नागिरी- शहराचे बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता (कोव्हिड - १९) सोमवारी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केला.
कोरोनाशी लढा : श्री देव भैरी देवस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखांचा निधी - ratnagiri corona updates
धनादेश देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केला.
कोरोनाशी लढा : श्री देव भैरी देवस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखांचा निधी
दरम्यान, यावेळी विश्वस्त मंडळाचे कार्यवाह अप्पा अकिवाटे, खजिनदार अभिजित तथा मनू गुरव आणि सदस्य विजय खेडेकर उपस्थित होते. या मदतीबदद्दल श्री. सामंत यांच्यासह आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड यांनी भैरी देवस्थानचे आभार मानले.