महाराष्ट्र

maharashtra

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्ससिनेट नौकांवर कारवाईची पारंपरिक मच्छिमारांची मागणी

By

Published : Feb 4, 2020, 5:32 PM IST

Updated : Feb 4, 2020, 5:49 PM IST

रत्नागिरी जिल्ह्यात पर्ससीन मच्छिमारी आमि एलईडी लाईटवर मासेमारी करणारे मच्छीमार यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. या बाबत पारंपरिक मच्छिमारांनी पर्सेसीन मच्छिमारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

demand-for-prosecution-of-boats-violating-traditional-fishing-rules
पारंपारिक मच्छिमाराची नियमांचे उल्लंघन करून कारवाई करणाऱ्या पर्ससिनेट नौकांवर कारवाईची मागणी

रत्नागिरी - जिल्ह्यात पुन्हा एकदा पारंपरिक, पर्सेसीन मच्छिमारी आणि एलईडी लाईटवर मासेमारी करणारे मच्छीमार यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. पर्सेसीन मच्छीमार नौकांवर मत्स्य विभाग कारवाई करत नसल्याचे म्हणत त्या विरोधात पारंपरिक मच्छिमारांनी दंड थोपटले आहेत. पर्सेसीन मच्छिमारीवर कारवाई करा, अशी मागणी पारंपरिक मच्छिमारांनी केली आहे. यासंदर्भात मिरकरवाडा बंदर ट्रॉलिंग लॉच मालक व मच्छीमार असोसिएशनने पोलीस प्रशासनाला सोमवारी निवेदन दिले आहे. एलईडी आणि पर्सेसीन मासेमारीबाबत मत्स्य विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा पारंपरिक मच्छीमार संघटनांनी दिला आहे.

पारंपारिक मच्छिमाराची नियमांचे उल्लंघन करून कारवाई करणाऱ्या पर्ससिनेट नौकांवर कारवाईची मागणी

या संदर्भात निवेदनात म्हटले आहे, की 'मस्त्य व्यवसाय खात्याचे अधिकारी जिल्हा प्रशासनाने दिलेले कारवाईचे आदेश का मानत नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत सखोल चौकशी व्हावी. नियमांचे उल्लघंन करुन माच्छिमारी करत असलेल्या पर्ससिनेट नौकांना मत्स्यव्यवसाय अधिकारी वर्ग का पाठिशी घालत आहे? असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

Last Updated : Feb 4, 2020, 5:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details