चिपळूण- तालुक्यातील खडपोलीत एका भल्या मोठ्या मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. खडपोलीतील शंकर गावणंग यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये भली मोठी मगर अचानक येऊन बसली होती.
चिपळूणमध्ये चक्क घराच्या कंपाउंडमध्ये शिरली मगर
खडपोलीत एका भल्या मोठ्या मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. खडपोलीतील शंकर गावणंग यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये भली मोठी मगर अचानक येऊन बसली होती.
पावसाच्या पाण्यामुळे नदीमधील पाण्याची पातळी वाढली. त्यामुळेच मगर गावणंग यांच्या घराच्या मेन गेटमधून घराच्या आवारात शिरली होती. गावणंग यांनी ही मगर पहिल्यानंतर तातडीने वन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी, वनरक्षक राजाराम शिंदे, दत्ताराम शिंदे, रामदास खोत यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, मानवी वस्तीत मगर आल्याने मगरीला देखील पुढे कुठे जावं हे कळत नव्हते. अखेर वन विभागाने अत्यंत शिताफीने या मगरीला ताब्यात घेतले. त्यानंतर मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.