रत्नागिरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे या काळात दक्षता कशी घ्यावी, तसेच नियम आणि इतर आवश्यक बाबींसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी चिपळूणमध्ये पोलीस बॅण्ड पथकाद्वारे संपूर्ण शहरात जनजागृती करण्यात येत आहे.
हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष : कोरोना आणि लॉकडाऊनचा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रावरील परिणाम
या पथकाद्वारे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बॅण्ड वाजवून जनजागृती करण्यात येत आहे. लोकांना देशसेवा करायची असेल तर ती घरी राहूनच करावी, असा संदेश या माध्यमातून देण्यात येत आहे. चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहरांमध्ये अशी जनजागृती केली जात आहे.
जनजागृती करणाऱ्या पोलीस बॅण्ड पथकाचे नागरिक ठिकठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत तसेच कौतुकदेखील करत आहेत. पोलीस बांधव लॉकडाऊन लागल्यापासून अविरत सेवा देत आहेत. वेगवेगळे उपक्रम रावबून कोरोना बाबात जागृती करत आहेत. सेवा तसेच अशाप्रकारे उपक्रम राबवून नागरिकांमध्ये मनोबल वाढविण्याचे कार्य करत असल्याने त्यांना सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना सूचना देऊन या कठीण प्रसंगी घेण्याच्या दक्षता याबाबत माहिती देत आहेत.