महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्र सरकारविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचे निषेध आंदोलन - मोदी सरकार

केंद्र सरकार विरोधात रत्नागिरीत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीतील काँग्रेस भवनाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचे निषेध आंदोलन
केंद्र सरकारविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचे निषेध आंदोलन

By

Published : May 30, 2021, 3:44 PM IST

रत्नागिरी - केंद्र सरकार विरोधात रत्नागिरीत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवण्यात आला. जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीतील काँग्रेस भवनाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारला पहिले पाच वर्षे आणि दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, या सात वर्षांत देशाला मोदी सरकारने मागे नेले, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

केंद्र सरकारविरोधात रत्नागिरीत काँग्रेसचे निषेध आंदोलन

काळे झेंडे दाखवून नोंदवला निषेध

हे सरकार अपयशी असल्याचा आरोप करत, काँग्रेसकडून मोदी सरकारविरोधात हा एल्गार पुकारण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतही काँग्रेसने मोदी सरकारचा निषेध केला. येथील काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध नोंदवला आहे. या आंदोलनाच्या वेळी 'सात वर्षे अपयशाची, जनतेवरील अन्यायाची', 'मोदी सरकार हाय हाय', मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी, सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर काद्री, मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे, महिला तालुकाध्यक्ष रिझवना शेख, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन मालवणकर उपस्थित होते.

हेही वाचा -पंडित नेहरु, गांधींच्या पुण्याईवर देश चालतोय, मोदींनी आत्मचिंतन करावे - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details