महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपळूणला पुराचा वेढा कायम, जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशीही चिपळूणला पुराचा वेढा कायम आहे. चिपळूण बाजारपेठेसह वडनाका, वेस मारुती मंदिर, बहादूरशेख, खेर्डी परिसरात पुराचे पाणी भरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

chiplun flood continues on day three

By

Published : Aug 7, 2019, 10:56 AM IST

Updated : Aug 7, 2019, 11:18 AM IST

रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे सलग तिसऱ्या दिवशीही चिपळूणला पुराचा वेढा कायम आहे. चिपळूण बाजारपेठेसह वडनाका, वेस मारुती मंदिर, बहादूरशेख, खेर्डी परिसरात पुराचे पाणी भरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चिपळूणला पुराचा वेढा कायम, जनजीवन विस्कळीत

चिपळूण शहरातील जुने बस स्टँड, मच्छी मार्केट, चिंचनाका, भाजी मार्केट या परिसरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच भोगाळे आणि मध्यवर्ती एसटी स्टँड परिसरातही पाणी भरले आहे.

वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. शहरातील अंतर्गत तसेच गावांना जोडणारे रस्तेही पाण्याखाली गेल्याने बससेवा कोलमडली आहे.

Last Updated : Aug 7, 2019, 11:18 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details