महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रकांत पाटील यांच्याकडून कशेडी बोगद्याच्या बांधकामाची पाहणी

राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या बांधकामाची पाहणी केली. कशेडी बोगदा खोदकामाचे 150 मीटरचे काम पूर्ण झाले असून बोगद्याचे बाकी काम विहीत मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्क केला.

चंद्रकांत पाटील यांच्या कडून कशेडी बोगद्याच्या बांधकामाची पाहणी

By

Published : Jul 14, 2019, 7:53 PM IST

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या बांधकामाची पाहणी आज राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कशेडी बोगदा खोदकामाचे 150 मीटरचे काम पूर्ण झाले असून बोगद्याचे उर्वरीत काम विहीत मुदतीत पूर्ण करण्यात येईल. तसेच मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांच्या कडून कशेडी बोगद्याच्या बांधकामाची पाहणी

कशेडी घाटाचे बांधकाम हे मुंबई-गोवा महामार्गावरील एक वेगळेपण दाखविणारे आहे. यावेळी पाटील यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी देखील केली. गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा मुंबई-गोवा महामार्गावरचा प्रवास सुखकर कसा होईल याची पूर्ण दक्षता घेण्यात येईल. ज्या ठिकाणी पावसामुळे रस्त्याला भेगा गेल्या आहेत अथवा रस्ता नादुरुस्त झाला आहे, अशा ठिकाणी दुरुस्तीची कामे अथवा गरज भासल्यास तो रस्ता नवीन केला जाईल. अशी माहिती पाटील यांनी दिली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार संजय कदम, खेड उपविभागीय अधिकारी अविनाश सोनाने, महामार्ग चौपदरीकरणाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details