रत्नागिरी- जिल्ह्यात दिवसभर (शनिवार) पावसाची संततधार सुरू आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीला पुन्हा पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेला पुराचा वेढा पडला आहे. बाजारपेठेत जवळपास पाच ते सहा फूट पाणी साचले आहे. तसेच चांदेराई-लांजा रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसामुळे ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.
रत्नागिरीत मुसळधार! चांदेराई बाजारपेठेला पुराचा वेढा - पाणी साचले
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. काजळी नदीला पुन्हा पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेला पुराचा वेढा पडला आहे.
रत्नागिरी
पाणी रस्त्यावर आल्याने चांदेराई लांजा आणि चांदेराई रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा चांदेराईला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. बाजारपेठेतील साचलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.