रत्नागिरी- निसर्ग चक्रीवादळात भरकटून मिर्या किनार्याला लागलेले बसरा स्टार एजन्सीचे इंधनवाहू जहाज किनार्यावर पुरते बसले आहे. उधाणाच्या तडाख्यात जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याने त्यांना चार दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यांनी जहाज भंगारात काढणे किंवा दुरूस्त करण्याचा निर्णय घ्यायचा आहे, अशी माहिती प्रादेशिक बंदर विभागाकडून देण्यात आली आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हे जहाज भरकटून मिर्या किनार्यावर लागले आहे. दीड महिना झाले तरी जहाज काढण्याबाबत एजन्सीकडून अपेक्षित गती दिसत नाही. त्यात भरतीमुळे उठणार्या अजस्र लाटांचा मारा जहाज सोसत आहे. त्यामध्ये जहाज दयनीय अवस्था झाली आहे. जहाजामध्ये पाणी भरून केबिन असलेला भाग किनार्यावर रुतला आहे. त्यामुळे जहाज हेलकावे खावून बंधार्याला आदळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.