महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपळूणमधील क्वाॅलिटी बेकरीमध्ये बॉयलरचा स्फोट; २ कामगार जखमी - police

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख येथील क्वॉलिटी बेकरीत आज सकाळच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगार जखमी झाले आहेत.

चिपळूणमधील क्वाॅलिटी बेकरीमध्ये बॉयलरचा स्फोट

By

Published : Jun 23, 2019, 4:28 PM IST

Updated : Jun 23, 2019, 5:27 PM IST

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख नाका येथील क्वाॅलिटी बेकरीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन २ कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आज (रविवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या बेकरीचे बांधकाम अनधिकृत असून, या स्फोटाची चौकशी पूर्ण होईपर्यंत बेकरी सुरु करू नये, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रशासनाकडे केली आहे.

चिपळूणमधील क्वाॅलिटी बेकरीमध्ये बॉयलरचा स्फोट

चिपळूण तालुक्यात क्वाॅलिटी बेकरी प्रसिद्ध आहे. या बेकरीच्या अनेक शाखा आहेत. त्यापैकीच एक शाखा बहादूरशेख नाका येथे आहे. या बेकरीच्या आजूबाजूला दुकाने आहेत. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. ज्या इमारतीमध्ये ही बेकरी आहे, त्या बेकरीच्या वरच्या मजल्यावर चिपळूण नागरी पतसंस्थेचे कार्यालय आहे. त्यामुळे अनेक लोकांची येथे नेहमी वर्दळ असते. त्यात आज रविवार असल्यामुळे सकाळच्या वेळेत या बेकरीत नाष्टा करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. आणी अशातच साडेनऊच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आणि ग्राहकांची धावपळ झाली. या बेकरीतील बॉयलरचा स्फोट होऊन त्याचे झाकण आणि इतर वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. या स्फोटात एका महिलेसह एकूण दोन कामगार जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान या बेकरीमध्ये जवळपास ९ भरलेले गॅस सिलेंडर असल्याचे बोलले जात आहे मात्र अधिकृतपणे किती गॅस सिलेंडर भरलेले होते याची माहिती मिळालेले नाही. सुदैवाने हा स्फोट सिलेंडरचा नव्हता, नाहीतर पूर्ण इमारत भस्मसात झाली असती. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक पोळ तसेच तहसीलदार जीवन देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली.या स्फोटामुळे बेकरीच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या बेकरीमध्ये कोणत्याही प्रकारचे फायर फॅटिंग उपकरण नसल्याचे या स्फोटामुळे समोर आले. दरम्यान या बेकरीचे अतिरिक्त बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केला. त्यामुळे या स्फोटाची पूर्ण चौकशी होईपर्यंत बेकरी सुरू करू नये, अशी मागणी प्रशांत यादव यांनी केली आहे. आशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून बेकरी आणि हॉटेल चालवणाऱ्या सर्वांची चौकशी करावी, अशी मागणी तहसीलदार देसाई यांच्याकडे प्रशांत यादव यांनी केली आहे.

Last Updated : Jun 23, 2019, 5:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details