महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत मोठ्या बोटीने धडक दिल्याने 'नावेद 2' बुडाली? 1 खलाशाचा मृतदेह सापडला, 5 बेपत्ता

मच्छिमारीसाठी बाहेर पडलेल्या नावेद 2 या मच्छिमार बोटीला जयगड बंदरात येणाऱ्या एका मोठ्या बोटीने धडक दिल्यामुळे ती बोट बुडाली. त्यावरील एका खलाशाचा मृतदेह सापडला तर उर्वरित पाच खलाशी बेपत्ता आहेत. हे सर्व प्रकरण गंभीर असून बंदर विभाग व तटरक्ष दलाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही बेट 26 ऑक्टोबरला मासेमारीसाठी जयगडहुन निघाली होती. असे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्याना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

boat sank after being hit by a big boat in Ratnagiri? 1 sailor's body found, 5 missing
रत्नागिरीत मोठ्या बोटीने धडक दिल्याने 'नावेद 2' बुडाली? 1 खलाशाचा मृतदेह सापडला, 5 बेपत्ता

By

Published : Nov 7, 2021, 12:42 PM IST

Updated : Nov 7, 2021, 1:35 PM IST

रत्नागिरी -समुद्रात 26 ऑक्टोबर रोजी मासेमारीसाठी गेलेली नौका अद्यापही परत आलेली नाही. या नौकेवर सहा खलाशी होते. याबाबत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

माजी आमदार डॉ. विनय नातू यांची प्रतिक्रिया

26 ऑक्टोबर रोजी निघालेली बोट परतलीच नाही -

त्यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, मच्छिमारीसाठी बाहेर पडलेल्या नावेद 2 या मच्छिमार बोटीला जयगड बंदरात येणाऱ्या एका मोठ्या बोटीने धडक दिल्यामुळे ती बोट बुडाली. त्यावरील एका खलाशाचा मृतदेह सापडला तर उर्वरित पाच खलाशी बेपत्ता आहेत. हे सर्व प्रकरण गंभीर असून बंदर विभाग व तटरक्ष दलाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ही बेट 26 ऑक्टोबरला मासेमारीसाठी जयगडहुन निघाली होती.

डॉ. नातू यांनी पत्रात काय म्हटले आहे?

याबाबत डॉ. नातू यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, काही बोटींनी या बेपत्ता बोटीचा अपघात प्रत्यक्ष पाहिला आहे. एवढेच नव्हे तर मच्छिमार बोटीवरील मृतदेह देखील पहिले. परंतु, ते किनाऱ्यावर आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत. अप्रत्यक्षरित्या अशा बोटीही या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत, असा दावा या पत्रामध्ये करण्यात आला आहे. बंदर विभाग व कोस्टगार्ड या विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रामध्ये म्हटले आहे.

सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी -

जयगड बंदरांमध्ये 20 ऑक्टोबरपासून कोण कोणत्या मोठ्या बोटी आल्या व गेल्या याची चौकशी करणे आवश्यक आहे. या चौकशीमध्ये ज्याप्रमाणे बोटीचा विमा उतरवला जातो तसाच खलाशांचा विमा बोट मालकाकडून उतरवला जातो का, खलाशांचा विमा उतरवण्या करीता मत्स्य व्यवसाय विभाग लक्ष देते का? याची सुद्धा चौकशी करण्याची गरज आहे. जयगड खाडीमध्ये गेल्या चार ते पाच वर्षात दरवर्षी तीन से चार खलाशांचे अपघाती मृत्यू होत असून तात्पुरती मदत देऊन सर्व प्रकरणे बंद केली जात आहेत. काही परराज्यातील खलाशी येथे काम करतात तसेच अत्यंत गरीबीमध्ये असणारे अनेक खलाशी प्राण गमावतात. पण याबाबत त्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही. या बेपत्ता बोटीवरील खलाशाच्या झालेल्या मृत्यू बाबत संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉ. विनय नातू यांनी पत्रातून केली आहे.

हेही वाचा -स्वातंत्र्याची 75 वर्षे : जाणून घ्या, लोकमान्य टिळकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान

Last Updated : Nov 7, 2021, 1:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details