महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा, शिवसेनेच्या भूमिकेकडे रिफायनरी विरोधकांचे लक्ष - Refinery Project

सत्तेत असलेला शिवसेना पक्ष या नाणार प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेसोबत आहे. तर दुसरीकडे भाजपचे लोक या प्रकल्पाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे नागरिकांना कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न पडला आहे.

रिफायनरी समर्थकांचा मोर्चा

By

Published : Jul 19, 2019, 10:37 PM IST

रत्नागिरी -रिफायनरी प्रकल्प जिल्ह्यातच व्हावा, या मागणीसाठी रिफायनरी समर्थकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी याबाबत माहिती दिली.

रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाबाबत भाजपची भूमिका मांडताना रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन

जिल्ह्यात वेगवेगळे उद्योग यावेत, ही आमची मागणी सातत्याने राहिली आहे. नाणार संदर्भात जे गैरसमज आहेत, ते दूर करुन जनतेच्या सहकार्याने नाणार प्रकल्प येथे व्हावा, असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यामुळे आता जर यासाठी प्रयत्न होत असतील तर त्याला भाजपचा पाठिंबा असल्याचे पटवर्धन यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे सत्तेत असलेला शिवसेना पक्ष या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक जनतेसोबत आहे. तर दुसरीकडे भाजपचे लोक या प्रकल्पाला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे नागरिकांना कोणावर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न पडला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाणार मुद्द्यावर भाजपने शिवसेनेसोबत युती केली होती. युती झाल्यानंतर काही दिवसांत या प्रकल्पाबाबतची अधिसूचनाही रद्द झाली. आजही शिवसेना या प्रकल्पाच्या विरोधात आहे. पण आता पुन्हा एकदा भाजपने रिफायनरी समर्थकांच्या सुरात सूर मिळवल्याने शिवसेना भाजपबाबत नेमकी काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे.

दरम्यान, रिफायनरी विरोधकांनीही याच दिवशी मोर्चाची परवानगी प्रशासनाकडे मागितली आहे. जर आम्हाला परवानगी मिळाली नाही तर आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. आता प्रकल्प विरोधक नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details