रत्नागिरी -केंद्र सरकारच्या २० सप्टेंबर २०१८ च्या मानधनवाढीच्या अधिसूचनेची महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करावी, यासाठी आज रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱयांनीही धरणे आंदोलन केले़ आहे.
इतर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे समकक्ष मानधन द्यावे, पेन्शन मिळावी या मागण्यांकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
रत्नागिरीत विविध मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन - maharashtra
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे समकक्ष मानधन द्यावे, पेन्शन मिळावी या मागण्यांकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी कर्मचारी सभेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संज्योक्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी गुहागर, दापोली आणि मंडणगड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱयांनी धरणे आंदोलन केले़. त्यानंतर दुसऱया दिवशी मंगळवारी चिपळूण, खेड आणि संगमेश्वर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचा-यांनी धरणे आंदोलन केले होते. तर रत्नागिरीसह लांजा, राजापूर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱयांनी धरणे आंदोलन केले़.
जिल्हाध्यक्षा संज्योक्ती शिंदे, अंकिता महाडिक, शुभांगी मोरे, सारिका हळदणकर यांच्यासह सुमारे ५०० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.