रत्नागिरी - तब्बल अडीच महिन्यांनी केंद्रीय पथकाने पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. ते आले, त्यांनी पाहिले अन् निघून गेले अशाच प्रकारचा हा दौरा होता. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले होतं. 7 सदस्यीय केंद्रीय पथकाने चिपळूण आणि खेड मधील पूरग्रस्त भागात आज स्थानिक प्रशासनाला सोबत घेत पाहणी केली.
खेडमधील पोसरे दरड दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर हे पथक चिपळूणमध्ये दाखल झाले. यावेळी सर्वप्रथम चिपळूणमधील वाशिष्ठी नदी आणि वाशिष्ठी पुलाची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर शहरातील मुरादपूर भागात या पथकाने पाहणी केली. त्यानंतर डीबीजे महाविद्यालय येथे या पथकाने आढावा घेतला.