महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंदिरे उघडल्यानंतर गणपतीपुळ्यात दर्शनासाठी भाविकांची धाव - ganpatipule news today

पहिल्या संकष्टीला पश्चिम महाराष्ट्रासह विविध भागातील भक्तगणांनी गणपतीपुळ्यात हजेरी लावली.

श्री गणपतीपुळे मंदिर
श्री गणपतीपुळे मंदिर

By

Published : Dec 5, 2020, 7:57 PM IST

रत्नागिरी -कोरोनातील टाळेबंदीमुळे बंद असलेले मंदिरांचे दरवाजे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उघडल्यानंतर रत्नागिरीतील पर्यटनाला चालना मिळाली आहे. त्यामुळे प्रसिद्ध श्री गणपतीपुळेमध्ये दर्शनासाठी अनेकांनी धाव घेतली. टाळेबंदी उठल्यानंतर पहिल्या संकष्टीला पश्चिम महाराष्ट्रासह विविध भागातील भक्तगणांनी गणपतीपुळ्यात हजेरी लावली. मागील पंधरवड्याप्रमाणेच या दिवशी सुमारे साडेचार हजार पर्यटकांनी दर्शन घेतलं.

दिवसाला चार ते पाच हजार भक्तगण गणपतीपुळे मंदिरात-

दर महिन्याला येणाऱ्या संकष्टीला पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्यातील स्थानिक भक्तगण गणपतीपुळेत दर्शनासाठी येतात. अंगारकी संकष्टीला राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक येथे येतात. परंतु कोरोनातील टाळेबंदीमुळे गेले ८ महिने मंदिरे दर्शनासाठी बंद होती. दिवाळीत अखेरीला मंदिरे सुरू झाल्यानंतर दिवसाला चार ते पाच हजार भक्तगण गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येऊन जात आहेत.

श्री गणपतीपुळे मंदिर
संकष्टीच्या दिवशीही साडेचार हजार भाविकांनी घेतले दर्शन-

संकष्टीच्या दिवशी गर्दी होईल, अशी अपेक्षा होती ती त्याप्रमाणे ती खरीही ठरली. पंधरा दिवसांप्रमाणेच संकष्टीच्या दिवशी साडेचार हजार भाविकांनी दर्शन घेतलं. मंदिरामधून श्री दर्शन घेऊन आल्यानंतर किनाऱ्यावर बिनधास्तपणे पर्यटकांचा राबता दिसत होता. संकष्टीला सर्वाधिक गर्दी पश्चिम महाराष्ट्रामधून आलेल्या भाविकांची होती. निवास करणाऱ्यांचा टक्का अजूनही कमी आहे.

हेही वाचा-तोपर्यंत नव्या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करू देणार नाही; नितेश राणेंचा इशारा

हेही वाचा-'महाराष्ट्र आणि राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्नशील'

ABOUT THE AUTHOR

...view details