रत्नागिरी -पावसामुळेरत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. ही कोसळलेली दरड 24 तासानंतर प्रशासनाला हटवण्यात यश आले आहे.
रत्नागिरीतील रघुवीर घाटात कोसळलेली दरड २४ तासानंतर हटवण्यात प्रशासनाला यश - Satara Ratnagiri Marg
मुसळधार पावसामुळे खेडच्या रघुवीर घाटात बुधवारी ४ वाजता दरड कोसळली होती. अखेर २४ तासांनी दरड बाजूला करण्यात यश आले. त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
मागील २ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेडच्या रघुवीर घाटात बुधवारी ४ वाजता दरड कोसळली होती. अकल्पे गावाजवळ ही दरड कोसळल्याने 15 गावांचा संपर्क तुटला. दरड कोसळल्याने साताऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तब्बल २४ तास हा मार्ग बंद होता. या भागात पाऊस असल्याने दरड हटवण्याच्या कामात अडथळे निर्माण होत होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले. अखेर २४ तासांनी दरड बाजूला करण्यात यश आले. त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.