महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 18, 2022, 6:49 PM IST

Updated : Jul 18, 2022, 7:21 PM IST

ETV Bharat / state

Maharashtra ST Bus Condition : रत्नागिरी विभागातून धावणाऱ्या 600 एसटी बसेसच्या सुरक्षेबाबत 'अशी' घेतली जाते काळजी

रत्नागिरी विभागामध्ये दररोज 600 ते 625 बसेस धावतात. चालक आणि वाचकांची दरवर्षी शारीरिक आणि डोळ्यांची तपासणी केली जाते. एखादा कर्मचारी महिनाभर गैरहजर असेल तर त्याला पुन्हा ट्रेनिंगला बोलावले जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने वारंवार सूचना दिल्या जातात, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली आहे.

रत्नागिरी बस
रत्नागिरी बस

रत्नागिरी -मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस इंदूरहून अंमळनेरकडे निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एसटी प्रवसाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी विभागामध्ये दररोज 600 ते 625 बसेस धावतात. चालक आणि वाचकांची दरवर्षी शारीरिक आणि डोळ्यांची तपासणी केली जाते. एखादा कर्मचारी महिनाभर गैरहजर असेल तर त्याला पुन्हा ट्रेनिंगला बोलावले जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने वारंवार सूचना दिल्या जातात, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अनिल मेहतर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देताना विभागीय वाहतूक अधिकारी

काय आहे घटना? :इंदूरहून जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरकडे निघालेली बस नर्मदा नदीत कोसळून 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील धार येथे ही घटना घडली. या बसमध्ये 40 प्रवासी होते. नदीच्या पुलावरील कठडा तोडून ही बस नदीपात्रात कोसळली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली. इंदोरहून ही बस सकाळी साडेसात वाजता निगाली होती. खलघाट अणि ठीगरीमध्ये नर्मदा पुलावर येताच या बसचा अपघात झाला. चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक), प्रकाश श्रावण चौधरी (वाहक) हे दोघेही या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंची मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेनंतर तातडीने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्याकडून या घटनेसंदर्भात माहिती घेतली.शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत सांगितले की, इंदूरहून अंमळनेरकडे येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री यासंदर्भात मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.

हेही वाचा -Maharashtra Bus Accident : मध्यप्रदेशात एसटी बसचा अपघात, 13 जणांचा मृत्यू; आठ जणांची ओळख पटली

Last Updated : Jul 18, 2022, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details