महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिपळूण तालुक्यात घराच्या कंपाऊंडमध्ये घुसलेल्या मगरीला पकडण्यात वनविभागाला यश - मगर

चिपळूण तालुक्यातील कामथे-माटेवाडी येथे घराशेजारील कंपाऊंडमध्ये घुसलेल्या एका मगरीला चिपळूण वनविभागाने पकडून सुरक्षित अधिवासात सोडले आहे.

घटना

By

Published : Aug 22, 2019, 4:52 PM IST

रत्नागिरी - घराच्या कंपाऊंडमध्ये घुसलेल्या एका मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. चिपळूणमधल्या कामथे-माटेवाडी या गावात ही घटना घडली. पकडलेल्या या मगरीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अधिवासात सोडले आहे.

घराच्या कंपाऊंडमध्ये घुसलेल्या मगरीला पकडण्यात यश


चिपळूण तालुक्यातील कामथे गावातील अजय तटकरे यांच्या घराशेजारील कंपाऊंडमध्ये मगर घुसली होती. याद्दलची माहिती वन विभागाला मिळताच तातडीने वन विभागाचे अधिकारी वनपाल रामदास खोत आणि त्यांचे सहकारी अजय तटकरे यांच्या कंपाऊंडमध्ये दाखल झाले. त्यांनी प्रथम मगरीच्या गळ्यात फास अडकवला. त्यानंतर या मगरीला पिंजऱ्यात दोरीच्या सहाय्याने जेरबंद करण्यात आले. त्यानंतर या मगरीला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहे. तर, गेल्या महिन्याभरापासून चिपळूण शहरात देखील मोठ्या प्रमाणात मगरीचा वावर सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details