महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत 'बर्निंग कार'चा थरार, सुदैवाने चालक बचावला - burning car news

शहरातील मध्यवर्तीच्या रस्त्यावर एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने ही बाब वाहनचालकाच्या लक्षात येताच तो गाडीतून खाली उतरल्याने बचावला.

बर्निंग कार

By

Published : Sep 27, 2019, 3:06 PM IST

रत्नागिरी - शहरातील मध्यवर्तीच्या रस्त्यावर एका चालत्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने ही बाब वाहनचालकाच्या लक्षात येताच तो गाडीतून खाली उतरल्याने बचावला.

बर्निंग कार


शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शुक्रवारी सकाळी बर्निंग द कारचा थरार पहायला मिळाला. शहरातील आठवडा बाजार इथे चालत्या इंडिका कारने अचानक पेट घेतला. आठवडा बाजारकडून काँग्रेस भवनच्या दिशेने हि गाडी येत होती. कार पुढे जात असताना आवाज झाल्याने चालक खाली उतरला. तो खाली उतरताच गाडीतून धूर येत असल्याचे दिसले आणि त्यानंतर काही क्षणातच गाडीने पेट घेतला. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती देताच अवघ्या काही मिनिटात नगपरिषदेचा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. या बंबच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत कारचे मोठे नुकसान झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details