रत्नागिरी - जिल्ह्यात बुधवारी पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच होती.
रत्नागिरीत दिवसभर पावसाची संततधार; बळीराजा सुखावला - महाराष्ट्र
रत्नागिरी जिल्ह्यात बुधवारी पावसाने चांगलीच हजेरी लावली. सकाळपासूनच जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
वायू चक्रीवादळाचा फटका राज्याच्या वेशीवर आलेल्या मान्सूनला बसला आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास आणखी काही दिवस लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बळीराजाला दमदार पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. मागील ४ दिवस जिल्ह्यात दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. परंतु, बुधवारी मात्र सकाळपासूनच पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यानंतर दुपारच्या सुमारास सुरू झालेला पाऊस जवळपास ४ तास कोसळत होता. दरम्यान, गेल्या २४ तासांत ९३ मिमी पाऊस पडला असून सरासरी १०.३३ पाऊस पडला आहे. राजापूर तालुक्यात सर्वाधिक २३ मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बळीराजा या पावसाने चांगलाच सुखावला आहे.