रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, सकारात्मक बाब म्हणजे आजपर्यंत (सोमवार) 55 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
रत्नागिरीत आतापर्यंत 55 रुग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 156 वर पोहोचली आहे. यामध्ये 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. सोमवारी आणखी काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सोमवारपर्यंत एकूण 55 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 156 वर पोहोचली आहे. यामध्ये 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. सोमवारी आणखी काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सोमवारपर्यंत एकूण 55 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 97 वर आली आहे.
एकीकडे कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करत असलेल्यांची संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एका सहा महिन्याच्या बाळाने सुद्धा कोरोनावर मात केलेली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण कोरोनावर मात करत असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे.