महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुखद बातमी; रत्नागिरीतील 27 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

राजीवडा येथील कोरोनाग्रस्त रुग्णाचा सलग दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. सलग दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने राजीवडा येथील रुग्ण कोरोनामुक्त झाला असला, तरी त्याच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

Rural
जिल्हा रुग्णालय

By

Published : Apr 20, 2020, 3:08 PM IST

रत्नागिरी- जिल्हा रुग्णालयात 27 जणांचे कोरोना अहवाल आज प्राप्त झाले. यामध्ये कळंबणी येथील सहा दापोली येथील सहा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील 15 असे एकूण 27 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे या 27 अहवालात राजीवडा येथील कोरोनाग्रस्त रुग्णाचा सलग दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. सलग दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने राजीवडा येथील रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.

याआधी गुहागर शृंगारतळी येथील रुग्ण कोरोनामुक्त झाला होता. कोरोनामुक्त झाल्यानंतरही पुढील काही दिवस राजीवडा येथील रुग्णावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष असणार आहे. पुढील चौदा दिवस या रुग्णाला होम क्वारंटाईन किंवा हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करण्यात येणार असून याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

रत्नागिरीत अद्याप साखरतर येथील तीन कोरोना रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये दोन महिला आणि एका सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. यापैकी दोघांचे अहवाल तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल मंगळवारी सकाळपर्यंत अपेक्षित आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details