महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीतील मंडणगडमध्ये 15 व्या 'कासव महोत्सवा'ला सुरुवात

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये 15 व्या कासव महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र वनविभाग कासव संरक्षण मोहीम ग्रामस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करतात. कासव महोत्सवाचा अनुभव घेणासाठी महाराष्ट्रातील त्याचबरोबर देशभरातून देखील पर्यटक याठिकाणी भेट देत असतात.

रत्नागिरीतील मंडणगडमध्ये 15 व्या 'कासव महोत्सवा'ला सुरुवात
रत्नागिरीतील मंडणगडमध्ये 15 व्या 'कासव महोत्सवा'ला सुरुवात

By

Published : Mar 10, 2020, 1:03 PM IST

Updated : Mar 10, 2020, 2:39 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील मंडणगडमध्ये 15 व्या कासव महोत्सवाला सुरुवात झाली आहे. मंडणगड तालुक्यातील वेळास या गावी हा अनोखा कासव महोत्सव आयोजित केला जातो. 28 मार्चपर्यंत हा कासव महोत्सव चालणार आहे. कासव मित्र मंडळ आणि वेळास ग्रामपंचायतीकडून कासवांची घरटी संरक्षित केली जातात आणि त्यानंतर हा महोत्सव आयोजित केला जातो.

रत्नागिरीतील मंडणगडमध्ये 15 व्या 'कासव महोत्सवा'ला सुरुवात

महोत्सवादरम्यान, कासवांची पिल्ले समुद्रात सोडली जातात. याला पर्यटकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र वनविभाग कासव संरक्षण मोहीम ग्रामस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करतात. कासव महोत्सवाचा अनुभव घेणासाठी महाराष्ट्रातील त्याचबरोबर देशभरातून देखील पर्यटक याठिकाणी भेट देत असतात.

हेही वाचा -पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंच्या कामावर अमितची नजर

Last Updated : Mar 10, 2020, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details