रत्नागिरीत आणखी 14 नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या 270 वर
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या सापडण्याचा वेग वाढलेला आहे. शनिवारी संध्याकाळी 22 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आज (रविवार) सकाळी आणखी 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
रत्नागिरी -जिल्ह्यात रविवारी आणखी 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे रुग्णसंख्या वाढून 270 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या सापडण्याचा वेग वाढलेला आहे. शनिवारी संध्याकाळी 22 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आज (रविवार) सकाळी आणखी 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटीव्ह आलेल्या अहवालांमध्ये रत्नागिरीतील 4 अहवाल, लांजा 3, गुहागर 3, कामथे 3 आणि दापोलीतील 1 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची रुग्णसंख्या आता 270 वर पोहचली आहे.
आणखी एकाचा मृत्यू -
कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 7 वर गेली आहे.