महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क - voting

अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रुपेश पाटील या नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी केले मतदान

रुपेश पाटील (नवरदेव)

By

Published : Apr 23, 2019, 7:19 PM IST

रायगड- जिल्ह्यात आज लग्नाचा मुहूर्त असल्याने लग्नघरी धावपळ सुरू होती. तसेच आज मतदानाचा दिवस असल्याने आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वधु-वरही आघडीवर होते. अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रुपेश पाटील या नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी करवल्यांसह मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावला.

रुपेश पाटील (नवरदेव)

आज (२३ एप्रिल) रायगड लोकसभेसाठी मतदान पार पडले. त्यातच आज व उद्या लग्नाचा मुहूर्त असल्याने जिल्ह्यात लग्नाचीही धामधूम सुरू आहे. असे असूनही बोहल्यावर चढणापूर्वी वधु-वरांनी मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details