पनवेल -महापालिकेसमोरील लेंडाळे तलावात आठ वर्षाचा मुलगा बुडत असल्याचे स्थानिक तरुणांच्या लक्षात येताच त्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला वाचवले. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पनवेलच्या लेंडाळे तलावात बुडनाऱ्या मुलाला तरुणांनी वाचवले
या मुलाला पाण्यात बुडताना पाहून तेथील स्थानिक तरुणांनी आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी पाण्यात उतरून काढले. यामुळे त्याचा जीव वाचवला. रुग्णवाहिका बोलवून त्याला ताबडतोब उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पनवेल महापालिकेसमोर हा लेंडाळे तलाव आहे. नुकतेच या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या तलावाच्या शेजारी आजूबाजूला राहणारी लहान मुल नेहमीच खेळत असतात. आज या तलावाच्या आजूबाजूला खेळत असताना आठ वर्षांचा मुलगा तलावात उतरला. लेंडाळे तलावात कारंज्या उभारण्यासाठी खड्डा खणला होता. तलावात खेळता-खेळता मुलगा या खड्डयात पडला. या मुलाला पाण्यात बुडताना पाहून तेथील स्थानिक तरुणांनी आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी पाण्यात उतरून काढले. यामुळे त्याचा जीव वाचवला.
रुग्णवाहिका बोलवून त्याला ताबडतोब उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.