महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगडमध्ये तलावात बुडून तरुणाचा मृत्यू - खोपोली

ललित पुरोहित हा आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या ३ मित्रांसह विरेश्वर तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तलावात पोहताना मध्यभागी गेल्यानंतर तलावात असणाऱ्या शेवळात ललित अडकला.

मृत तरुण

By

Published : Jun 3, 2019, 12:47 PM IST

Updated : Jun 3, 2019, 2:00 PM IST

रायगड -खोपोली शहरात असलेल्या विरेश्वर तलावात एकजण बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. ललित राज पुरोहित (३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी गर्भवती असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तरुणाचा मृतदेह बाहेर काढताना बचाव पथक

ललित पुरोहित हा आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या ३ मित्रांसह विरेश्वर तलावात पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तलावात पोहताना मध्यभागी गेल्यानंतर तलावात असणाऱ्या शेवळात ललित अडकला. शेवळात अडकल्याने तो बुडू लागला. त्यावेळी त्याच्या मित्राने त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, शेवळात अडकल्यामुळे त्याला वाचवणे शक्य झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने येऊन ललितला शोधायला सुरुवात केली होती. मात्र, शेवाळ मोठ्या प्रमाणात असल्याने त्याला शोधण्यात अडचण येत होती. शेवटी जवळपास दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश मिळाले. ललितच्या पश्चात पत्नी, ५ वर्षांचा मुलगा आहे.

Last Updated : Jun 3, 2019, 2:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details