रायगड - नदीत बुडून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना खालापूर तालुक्यातील चावणे गावातील पाताळगंगा नदी पात्रात घडली. काही लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
पाताळगंगा नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू
गावानजीक पाताळगंगा नदी आहे. नदीपात्रात पाण्याचा साठा आहे. याठिकाणी प्रसन्न हे गेले होते. मात्र नदी पात्रात बुडून त्यांचा मृत्यू झाला. घटना समजाच काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विजय भोसले आणि अमित गुजरे यांनी पाण्यात उतरून मृतदेहाला बाहेर काढले.
प्रसन्न एकनाथ पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रसन्न हा मूळचा वैभववाडी (जि.सिंधुदुर्ग) येथील रहिवासी आहे. तो चावणे येथील एका नातेवाईकाकडे आला होता. गावानजीक पाताळगंगा नदी आहे. नदीपात्रात पाण्याचा साठा आहे. याठिकाणी प्रसन्न हे गेला. मात्र नदी पात्रात बुडून त्याचा मृत्यू झाला. घटना समजाच काही लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विजय भोसले आणि अमित गुजरे यांनी पाण्यात उतरून मृतदेहाला बाहेर काढले. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पाहुण्याचा करूण अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.