रायगड -सुनेने सासूच्या डोक्यात वरवंटा टाकून हत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील बेकरे गावात घडली. तारामती पांडुरंग कराळे (75) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून योगिता कराळे असे सुनेचे नाव आहे. घटनास्थळाहून नेरळ पोलिसांनी सुनेला ताब्यात घेतले आहे.
कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील घटना -
बेकरे गावात राहणाऱ्या तारामती कराळे या पहाटे घरी झोपलेल्या होत्या. तर पती पांडुरंग कराळे लवकर उठून घरा बाहेर पडले होते. पांडुरंग कराळे हे घरी परतल्यावर सहा वाजेच्या सुमारास पत्नीला उठवण्यासाठी गेले असता, पत्नी उठत नसल्याने घटना उघडकीस आली. तारामती यांच्या डोक्यात जबर मार बसला असून रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला होता.