पेण (रायगड) - जिल्हा व पेण तालुका ऑरेंज झोनमध्ये असताना देखील पेणमधील दारूची दुकाने न उघडल्याने सकाळपासूनच दारू विकत घेण्यासाठी आलेल्या तळीरामांचा भ्रमनिरास झाला आहे. सकाळी सुमारे 8 वाजल्यापासून ते दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत तळीराम दारूच्या दुकानाच्या बाहेर तोंडाला मास्क लावून रांगा लावून उभे होते.
पेण तालुक्यातील तळीरामांचा घसा कोरडाच, दारूची दुकाने सुरू न झाल्याने भ्रमनिरास - wine shopes off in pen
सकाळी सुमारे 8 वाजल्यापासून ते दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत तळीराम दारूच्या दुकानाच्या बाहेर तोंडाला मास्क लावून रांगा लावून उभे होते.
सुमारे दीड महिन्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सोमरसाचा आस्वाद घेता येईल अशी अपेक्षा बाळगून हे तळीराम दारूच्या दुकानाच्या बाहेर वाट पाहत होते. दुकान उघडल्यानंतर शक्य तेवढे जास्तीत जास्त "स्टॉक" घेऊन ठेवण्याच्या तयारीत हे तळीराम होते. तर, काहींनी दुकानातील कर्मचाऱ्यांना व मालकांना फोन करून दुकान कधी उघडेल याची चौकशी केली. परंतु, दुपारपर्यंत एक्साइज विभागाकडून कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त न झाल्याने पेणमधील दारूची दुकाने उघडली नाही. त्यामुळे या नाराज झालेल्या तळीरामांचा घसा मात्र सुकाच राहिला आहे.