महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाची धास्ती : मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नाची वरात निघत आहे रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवरून

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने लग्न सोहळे हे रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवर होऊ लागले आहेत. त्यामुळे लग्नाच्या वरती या आता रिसॉर्टवरून निघू लागल्या आहेत.

wedding in resort and farmhouse trend at raigad
कोरोनाची धास्ती : मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नाची वरात निघत आहे रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवरून

By

Published : Dec 16, 2020, 12:51 AM IST

रायगड - कोरोना प्रादुर्भावाचा फटका आपल्या नव्या संसाराची स्वप्न पाहणाऱ्या वधू वरानाही बसला आहे. अनेकांनी कोरोनामुळे आपला विवाह सोहळा पुढे ढकलला. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आणि दिवाळीनंतर विवाह हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पुन्हा सनई चौघडेचे सूर कानी पडू लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने लग्न सोहळे हे रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवर होऊ लागले आहेत. त्यामुळे लग्नाच्या वरती या आता रिसॉर्टवरून निघू लागल्या आहेत.

लग्नाची वरात निघत आहे रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवरून...
लग्न सोहळ्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने रिसॉर्ट फार्म हाऊस उत्तममार्च ते मे महिन्याचा विवाह हंगाम हा कोरोनात गेला. दिवाळी नंतर पुन्हा तुळशी लग्न झाल्यानंतर विवाह हंगाम सुरू झाला. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होऊ लागला असला तरी पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने लग्न सोहळा कार्यक्रम करण्यासाठी नियमावली दिली आहे. यामध्ये 50 व्यक्तीच्या उपस्थितीत लग्न सोहळा कार्यक्रम करणे गरजेचे आहे. अशावेळी हॉलमध्ये लग्न सोहळा करताना सुरक्षित अंतर राखणे जरा कठीणच असते. यासाठी दोन्ही कडच्या वऱ्हाडी मंडळीचा आता रिसॉर्ट किंवा फार्म हाऊसवर लग्न सोहळा करण्याकडे कल वाढू लागला आहे.मुंबई-पुणेमधील वऱ्हाडीची रायगडलाच पसंतीजिल्ह्यात अलिबाग, कर्जत, खोपोली या ठिकाणी विवाह सोहळ्यासाठी सुसज्ज असे रिसॉर्ट, फार्म हे वऱ्हाडी मंडळींना खुणावू लागले आहेत. शासनाने दिलेल्या नियमाच्या अनुषंगाने कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा कार्यक्रम सोहळा पार पाडण्यासाठी रिसॉर्ट आणि फार्म हाऊस हा एक उत्तम पर्याय समोर आला आहे. त्यामुळे रायगडसह मुंबई, पुणे याठिकाणाहून वऱ्हाडी मंडळी रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवर लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आग्रही आहेत.
लग्न सोहळ्यासाठी करण्यात आलेली सजावट
वेडिंग डेस्टिनेशनचे महत्व वाढलेअलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील कर्जत, खोपोली खालापूर तालुक्यातील रिसॉर्ट, फार्म हाऊस हे लग्न सोहळ्यासाठी आधीच बुक झाले आहेत. रिसॉर्ट, फार्म हाऊसची जागा ही मोकळी असल्याने सुरक्षित अंतर या नियमाचे पालन होते. त्यामुळे दिवाळीनंतर सुरू झालेला विवाह सोहळा हंगामात रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवर सनई चौघड्याचे सूर घुमू लागले आहेत. नववधू वराच्या वराती ह्या रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवर निघू लागल्या आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावमुळे वेडिंग डेस्टिनेशनचे महत्व जिल्ह्यात वाढू लागले आहे.नियमाचे पालन करून लग्न सोहळे संपन्नलग्न सोहळ्यासाठी आम्ही रिसॉर्ट देत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार लग्न सोहळे पार पडण्यास रिसॉर्ट हे फायदेशीर असल्याची भावना वऱ्हाडी मंडळींची आहे. त्यामुळे आम्हीही येणाऱ्या पाहुण्यांची तापमान तपासणी, मास्क, रिसॉर्ट सॅनिटायझर करून सुरक्षित अंतर पाळून, हा सोहळा संपन्न करीत आहोत आहे. साधारण 75 हजारापासून अडीच ते तीन लाख रुपये खर्च हा येत असतो.

ABOUT THE AUTHOR

...view details