महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धरणाच्या गावातच दुष्काळाच्या तीव्र झळा, कोथुर्डेमध्ये पाण्यासाठी नागरिकांची ३ किमी पायपीट - पाणी

या कोथुर्डे धरणातून महाड शहरासह बावीस गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आज कोथुर्डे हे गाव भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे.

धरणाच्या गावातच दुष्काळाच्या तीव्र झळा, कोथुर्डेमध्ये पाण्यासाठी नागरिकांची ३ किमी पायपीट

By

Published : May 15, 2019, 3:00 PM IST

रायगड- महाड तालुक्यातील कोथुर्डे गाव हे येथील धरणामुळे सर्वश्रृत आहे. पावसाळ्यात या ठिकाणी कोसळणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरतो, तर या कोथुर्डे धरणातून महाड शहरासह बावीस गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आज कोथुर्डे हे गाव भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे.

महाड ते किल्ले रायगडवर जाणाऱ्या रस्त्यालगत कोथुर्डे हे गाव आहे. वाडीवाडीवर जोडणारे रस्ते सपाट जमिन आणि निसर्गसंपन्न परीसर या गावात आहे. कोथुर्डे धरण आणि धबधब्यामुळे हे गाव सर्वांना माहित आहे. मात्र, यंदा या ठिकाणी सुट्ट्यासाठी गावी येणारे चाकरमानी आणि येथील ग्रामस्थ पाणीटंचामुळे त्रस्थ आहेत.

धरणाच्या गावातच दुष्काळाच्या तीव्र झळा, कोथुर्डेमध्ये पाण्यासाठी नागरिकांची ३ किमी पायपीट

महाड तालुक्यातील सर्वात मोठा जलस्त्रोत म्हणजे कोथुर्डे धरण याच गावाच्या हद्दीत आहे. धरणाच्या कोरड्या पात्रातील विहिरींना आजही थोडे फार पाणी आहे. मात्र, हे पाणी नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून गावात येत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

कोथुर्डे गावासाठी १ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना शासन दरबारी प्रलंबीत आहे. मात्र, ही योजना पूर्ण झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी ही योजना लवकरात-लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात दरवर्षी करोडो रुपयांचा पाणी टंचाई आराखडा केला जातो. मात्र, पाणीटंचाईचा प्रश्न प्रत्येकवेळी आहे तसाच असतो, त्यामुळे येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details