महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कचऱ्याचे सोने करणारा 'ब्लॅक गोल्ड'; पनवेल महापालिकेची महिन्याला ८ लाखांची बचत - पनवेल

शहरात उकिरडे म्हणजेच डम्पिंग ग्राऊंड रोज कचऱ्याने भरत आहेत. त्याध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन सहज पेट घेणारे वायू तयार होतात. या आगी विझवण्यासाठी महापालिकेचा कित्येक रुपयांचा खर्च होतो. यावर उपाय म्हणून पनवेल महापालिकेचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या कल्पनेतून उभारलेल्या कचऱ्यातून निर्माण करणारा 'ब्लॅक गोल्ड'चा हा प्रकल्प.

सेंद्रीय खत तयार करताना कामगार

By

Published : Feb 27, 2019, 9:13 AM IST

पनवेल -शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पनवले महापालिकेच्या नगरसेवकांनी त्यावर उपाय शोधला आहे. त्यांनी कचऱ्यातून सेंद्रीय खत तयार करण्यासाठी 'ब्लॅक गोल्ड'चा प्रकल्प उभारला आहे. यामधून शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे महापालिकेचे महिन्याला ८ लाखांची बचत होत असल्याने हा प्रकल्प सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

शहरात सध्या सर्वात मोठा प्रश्न कचऱ्याचा आहे. अनेकदा तर कचरा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ-मोठी आंदोलने झाली, तर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रात्रीच्या काळोखात तो रस्त्यावर फेकून देत असल्याचा प्रकारही समोर आला होता. शहरात तयार होणाऱ्या लाखो टन कचऱ्याची विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची? या प्रश्नांनी सर्वच महापालिका हवालदिल झाल्या आहे. शहरात उकिरडे म्हणजेच डम्पिंग ग्राऊंड रोज कचऱ्याने भरत आहेत. त्याध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन सहज पेट घेणारे वायू तयार होतात. या आगी विझवण्यासाठी महापालिकेचा कित्येक रुपयांचा खर्च होतो. यावर उपाय म्हणून पनवेल महापालिकेचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या कल्पनेतून उभारलेल्या कचऱ्यातून निर्माण करणारा 'ब्लॅक गोल्ड'चा हा प्रकल्प.

पनवेलच्या खारघर, कळंबोली, नावडे, ओल्ड पनवेल, न्यू पनवेल आणि कामोठे या परिसरातील जवळपास २७ हॉटेल्समधून तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील जवळपास ३ हजार ५०० घरातून दिवसाला सुमारे ७ टन कचरा जमा करण्यात येतो. यामध्ये घराच्या टेरेसवर, गल्ल्यांमध्ये, झाडाच्या बुंध्याशी, पदपथाचा कोपरा, सोसायटीच्या तळघरात, छतावर, आवारात अक्षरशः जमेल तिथे स्वयंपाकघरातला कचरा घरातच वेगळा केला जातो. त्यामधील कुजणारा कचरा सेंद्रिय पद्धतीने कुजवण्यासाठीच्या संयंत्रात टाकला जातो. नावडे परिसरातील स्मशानभूमीच्या बाजूला उभारण्यात आलेल्या पिट्समध्ये हा कचरा रोजच्या रोज ढवळला जातो. कचऱ्याचे खतात रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या विघटनशील जीवाणूंचा साठा टाकलेला असतो. या पिट्समध्ये टाकलेला सर्व कचरा रोज ढवळला जातो. तयार झालेल्या खताला ऊन देण्यासाठी बाजूच्या जागेवर पसरवले जाते आणि क्रशच्या सहाय्याने बारीक केले जाते. ही सर्व प्रक्रिया पीसीएल वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत साताऱ्यातील शेतकरी पोपट लोखंडे यांच्यासह आणखी काही शेतकरी या कचऱ्याचा अक्षरशः सोनं करतात. कचऱ्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करून ते पुन्हा याच परिसरातील नागरिकांना अगदी मोफत दिला जातो. लोकही त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत.

पनवेल महापालिकेकडून कचरा विघटनासाठी महिन्याला ८ लाख रुपये खर्च करीत होती. मात्र, आता या प्रकल्पामुळे तो खर्चही वाचत आहे. कचऱ्यातून सोनं शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या नगरसेवक अरविंद म्हात्रे यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. किचन वेस्टमधून सेंद्रिय खतं तयार करणारा हा पनवेल मधला पहिला यशस्वी प्रयोग ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details