रायगड- रायगड लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का घसरला आहे. मात्र, २०१४ व २०१९ ची तुलना करता, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ८०० ते १२ हजाराने मते वाढलेली आहेत. मात्र, गुहागर मतदार संघात २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये १४५९ मतांची घट झालेली आहे. त्यामुळे ही वाढलेली मते कोणाच्या पारड्यात पडणार हे २३ मेच्या मतमोजणीवेळी स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्यातरी गीते की तटकरे विजयी होणार याबाबत चर्चा रंगलेली आहे.
रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अनंत गीते व महाआघाडीचे सुनील तटकरे यांच्यात ही लढत रंगतदार झालेली आहे. उमेदवारांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप करून प्रचारात धुरळा उडवला होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १५ लाख २९ हजार २८ एवढे मतदार होते. यापैकी ९ लाख ८८ हजार १८२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. २०१४ ला एकूण ६४.६० टक्के मतदान लोकसभा मतदारसंघात झाले होते.
१७ व्या लोकसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात १६ लाख ५१ हजार ५६० मतदार होते. २०१४ च्या तुलनेत १ लाख मतदार वाढले होते. यापैकी १० लाख २० हजार १८५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी ६१.७७ टक्के मतदान जिल्ह्यात पार पडले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पेणमध्ये १२ हजार ७८०, अलिबाग ४ हजार ६५७, श्रीवर्धन ८७७, महाड ६ हजार ११३ तर दापोली ९ हजार ४६५ एवढे मताधिक्य वाढलेले आहे. तर गुहागरमध्ये १४५९ मतांची घट झालेली आहे.
पेण, अलिबाग, महाड, दापोली या मतदार संघात २०१४ च्या तुलनेत मतांमध्ये वाढ झालेली आहे. तर श्रीवर्धन मध्ये फक्त ८७७ मतांची वाढ झालेली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदारसंघातून कोणाला मताधिक्य मिळणार यावर उमेदवाराचा विजय निश्चित होणार आहे. अनंत गीते व सुनील तटकरे या दोन बलाढ्य उमेदवारांमध्ये टक्कर असली तरी वंचित बहुजन आघाडी, बसपा, दोन अपक्ष सुनील तटकरे, अपक्ष उमेदवार हे सुद्धा मते मिळविणार आहेत. त्यामुळे तटकरे व गीते यांची मते विभागली जाणार आहेत.
२०१९ मध्ये मतदानाची टक्केवारी घसरली असून शासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करूनही मतदार राजा हा बाहेर पडला नाही. तर वाढलेली मते काही प्रमाणात मतपेटीत पडली असल्याचे एकंदरीत आकडेवारीवरून दिसत आहेत.
२०१४ ला झालेले मतदान -