रायगड - खोपोली मुळगाव येथे आपल्या नातेवाईकांकडे पुणे येथून पालकासोबत आलेल्या दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा पाताळगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. त्रिशा अमर सोनकांबळे (वय ६) व प्रगती अमर सोनकांबळे (वय ४) अशी बुडालेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत.
पाताळगंगा नदीत बुडून दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू - river
नातेवाईकांच्या घराच्या थोड्या अंतरावरून पाताळगंगा नदी वाहते. या नदीच्या किनाऱ्यावर रोमा, प्रगती व त्यांचा भाऊ हे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खेळत होत्या. त्यावेळी त्रिशा व प्रगती या नदीच्या पाण्यात उतरल्या. नदीच्या पाण्याला प्रवाह असल्याने दोघीही बहिणी बुडू लागल्या.
त्रिशा व प्रगती या बहिणी आपला भाऊ व पालकासोबत खोपोली मुळगाव येथे आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. नातेवाईकांच्या घराच्या थोड्या अंतरावरून पाताळगंगा नदी वाहते. या नदीच्या किनाऱ्यावर रोमा, प्रगती व त्यांचा भाऊ हे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खेळत होत्या. त्यावेळी त्रिशा व प्रगती या नदीच्या पाण्यात उतरल्या. नदीच्या पाण्याला प्रवाह असल्याने दोघीही बहिणी बुडू लागल्या.
त्रिशा व प्रगती नदीच्या पाण्यात वाहत जात असल्याचे बघून नदीकिनारी असलेल्या भावाने आरडाओरड केली. त्याची ओरड ऐकून मुलीचे आईवडील, नातेवाईक, स्थानिक हे नदी किनारी आले. दोघी मुली वाहून गेल्याचे कळताच खोपोली नगरपालिका अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी व स्थानिकांनी दोघीं बहिणीचा शोध सुरू केला. तेव्हा एका बहिणीचा मृतदेह शीळफाटा तर दुसरीचा शेडवली येथे सापडला. यामध्ये त्रिशा ही आधीच मयत झाली होती. प्रगती हिची धाकधूक सुरू असल्याने तिला तत्काळ खोपोलीतील पार्वती रुग्णालयात दाखल केले. प्रगतीला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न केले. मात्र चिमुकल्या प्रगतीला वाचविण्यात यश आले नाही.