महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रायगड मतदारसंघातील मतदानयंत्रावर दिसणार चक्क दोनवेळा अंनत गीतेंचे नाव - sp

मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी सारख्याच नावाचा उमेदवार विरोधकांनी उभा केला असल्याचे समजते.

शिवसेनेचे अनंत गीते

By

Published : Apr 3, 2019, 7:44 PM IST

रायगड - सपा व बसपा आघाडीचे उमेदवार मिलिंद साळवी यांनी बुधवारी रायगड लोकसभा मतदार संघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. तर, अनंत पद्मा गीते या अपक्ष उमेदवारानेही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे अनंत गीते व अपक्ष अनंत गीते हे २ सारख्याच नावाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे मतदान यंत्रावर अनंत गीते हे नाव चक्क दोन वेळा दिसणार आहे.

सपा, बसपा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली काढण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपा व सपा हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. बसपच्या यशवंत गायकवाड यांना १०६१० तर सपाचे अजीज मुकादम यांना २७६३ मते पडली होती. यावेळी दोन्ही पक्ष एकत्र आल्याने त्यांचे मताधिक्य वाढले जाण्याची शक्यता आहे.

सपा व बसपा आघाडीचे उमेदवार मिलिंद साळवी यांचा अर्ज भरण्यासाठी निघालेली रॅली

अनंत पद्मा गीते यांनी अपक्ष म्हणून लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते हे देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी सारख्याच नावाचा उमेदवार विरोधकांनी उभा केला असल्याचे समजते. मात्र, सारख्याच नावाचे उमेदवार देण्याची परंपरा रायगडमध्ये यानिमित्ताने लोकसभेतही पाहायला मिळाली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details