रायगड - अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या दोघांकडून डस्टर गाडी तसेच लाखोंचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात -
दोघेजण डस्टर गाडीमध्ये अवैध दारू घेऊन अलीबागमध्ये येत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कार्लेखिंड येथे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी न थांबविता भरधाव वेगाने अलिबागच्या दिशेने गाडी पळवली. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत पिंपळभाट येथे दोघांना ताब्यात घेतले.