महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Khopoli Highway Accident: पेण खोपोली मार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकीस्वार जागीच ठार - जागीच मृत्यू

पेण-खोपोली मार्गाचे काम सुरु असून, या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास झालेल्या दोन अपघातांमध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. स्कुटी व कारची जोरदार धडक तर दुसऱ्या अपघातात टेम्पो व दुचाकीची जोरदार धडक झाली आहे.

Khopoli Highway Accident
पेण खोपोली मार्गावर भीषण अपघात

By

Published : Mar 29, 2023, 7:33 AM IST


रायगड: कार आणि स्कुटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालक संदीप शिर्के वय 30 याचा जागीच मृत्यू झाला. तर याच मार्गावर गागोदे गावच्या बस स्टॉप जवळ सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकी चालक मनोज पाटील वय 37 याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी झाला.

समोरासमोर जोरदार धडक: स्कुटी क्रमांक एम एच 06 सी एफ 3326 खोपोलीच्या दिशेकडे जात होती. तर व्हेंटो कार क्रमांक एम एच 04 एफ आर 9763 खोपोलीहून पेणकडे येत होते. पेण पूर्व विभागातील सावरसई गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये दुचाकी चालक जागीच ठार झाला. तर पूर्व विभागामधील गागोदे गावाच्या बस स्टॉप जवळ खोपोलीकडून दुचाकी क्रमाक्र एम एच 06 बी झेड 8443 पेणच्या दिशेने जात असताना खोपोलीकडे जाणाऱ्या टेम्पो क्रमांक एम एच 06 बि डब्ल्यू 0579 यांच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.


धैर्यशील पाटील यांची रुग्णालयात भेट: अपघाताची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी, युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केेले. तर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी येणारे राजेंद्र जाधव यांनी तातडीने घटनास्थळी पोहचले. अपघातग्रस्तांना आमदार धैर्यशील पाटील यांच्या रुग्णवाहिकेतून पेणमधील उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील आणि मंगेश दळवी यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली.


रस्ता रोको आंदोलनाचा इशारा: अपघाताची नोंद पेण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. तर अधिक तपास पोलीस निरीक्षक पोळ करत आहेत. पेण-खोपोली मार्गावर अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने व संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गावर गतिरोधक व दुभाजक लावावेत अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

हेही वाचा:Pune Accident News दारूच्या नशेत गाडी चालवणे पडले महागात अपघातात दोन चिमुकल्यासह 5 जणांचा मृत्यू 3 गंभीर

ABOUT THE AUTHOR

...view details